बेळगाव महा पालिका पुन्हा एकदा शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवण्यात अपयशी ठरली आहे.वडगांव मलप्रभा नगर भागात नळाला पिण्याच्या पाण्या ऐवजी ड्रीनेज च पाणी येत असल्याने या भागातील जनता संतप्त झाली आहे.
एकीकडे बेळगाव स्मार्ट करायला निघालेले लोक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यां विरोधात येथील महिलांनी संतप्त अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या प्रभाग क्रमांक 14 मध्ये दर 8 दिवसाला एकदा नळाला पाणी येतंय आलं तरी ते ड्रीनेज च असतंय त्यामुळं या भागातील लोकांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे. प्रभाग 14 नगरसेवक दिनेश रावळ यांनी लक्ष द्यावे समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे.
वडगांव,संभाजी नगर, मलप्रभा नगर येथे आठवड्यातून एकदा ते केवळ तास पाणी पुरवठा होतो याकडे पालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
आपण व्हीडिओ सुद्धा पाहू शकता खालील लिंक क्लिक करून
https://m.facebook.com/story.php?story_fbid=456611578029774&id=375504746140458