बेळगावातील किर्लोस्कर रोड बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कॅशियर कडून 12 लाख चोरी केल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी सकाळी बेळगाव बाहेरील काही लोक कॅश काढण्यासाठी बँकेत प्रवेश केला आणि 12 लाख रुपये लांबविले. घटना झालेल्या दोन तासांनी चोरी झालेली लक्षात आलं. नुकताच बँकेचे रिनिवेशन करण्यात आलं असून जनतेसाठी काही दिवसापूर्वी ओपन करण्यात आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी साडे दहाच्या सुमारास पाच ते सहा जण बँकेत आले होते एक एकट्याने सर्व कर्मचाऱ्यांना माहिती विचारत व्यस्त केले त्यातील एकाने मागील बाजूने कॅश काउंटर मध्ये घुसून 12 लाख रुपये लांबविले आहेत. सी सी टी व्ही मध्ये हा प्रकार कैद झाला असून चोरट्यांचा शोध पोलीस घेताहेत. खडे बाजार पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.