लहानपनीच वडिलांचं छत्र हरपलेल्या सोबत आजारी आई आणि आजी आजोबा सह राहणाऱ्या एका कन्येला शिक्षण पूर्ण करायचं आहे आहे मात्र गरिबीमुळे तीच शिकण्याच स्वप्नं भंगतय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पण, अशात शिकण्याची इच्छा गप्प बसू देत नाही…, मदत मागणार तरी कुणाकडे आणि एकुलत्या मुलीचे पैशांअभावी शिक्षण तरी थांबणार नाही ना… हा मोठा प्रश्न ज्योती आणि तिच्या आईसमोर पडलेला आहे. त्यात काहींच्या मदतीमुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पहिल्या चार महिन्यांत जाण्याचा प्रश्न मिटला. पण, बस पास, रोजची धावपळ आणि चार महिन्यानंतर पुन्हा फीसाठी संभाव्य तडफड आतापासूनच ज्योतीच्या चेहऱ्यावर दिसते.
कंग्राळी खुर्द येथील ज्योती जगन्नाथ पाटील हिला दहावीत 52 टक्के गूण मिळाले. परिस्थितीशी दोन हात करत तिने मिळविलेले हे यश नक्कीच धवल असे. ज्योतीला महाविद्यालयीन शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करण्याची इच्छा. तिच्या इच्छांना आईच्या स्वप्नांचे बळ. पण, प्रत्यक्षात घरात कमावणारे कोणीच नाही. खाणारी चार तोंडे पण, विधवा वेतन आणि रेशनचा तांदुळ यावरच आयुष्याची गुजराण. त्यामुळे ज्योतीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची ऐपत प्रत्यक्षरित्या नव्हती. त्यामुळे हिरमुसलेल्या ज्योतीची तगतम वाढत होती.
ज्योतीने दहावीत मिळविलेले यश आणि पुढील शिक्षणासाठी होणारी तिची ही परवड अखेर सामाजिक कार्यकर्ते, कंग्राळी बुद्रूक येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांना समजली. त्यांनी आपण काही प्रमाणात मदत करू, असे सांगून ज्योती महाविद्यालयातून वाणिज्य शाखेला अर्ज आणला. पण, सर्व शुल्क त्यांनाही भरणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी संस्थेला शुल्क कमी करण्यासाठी विनंती करण्याचे ठरविले. यासाठी कंग्राळीचे प्रवीण पाटील यांनीही मदत केली. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव विक्रम पाटील यांना ज्योतीबाबतची माहिती दिली. त्यांनीही शुल्क कमी करण्याबाबत विचार करू, असे सांगितले.
सद्यस्थितीत ज्योतीला ज्योती महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. पण, बसपास, महाविद्यालयाचे ड्रेस आणि इतर खर्च याची चिंता तिच्यासमोर आहेच. शिवाय चार महिने झाल्यानंतर पुन्हा उर्वरीत शुल्क कसे भरायचे, असा प्रश्न तिच्यासमोर आहे. घरी दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबात ज्ञानासाठी ज्योती फडफडत असल्याने तिला आता समाजाच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे म्हणून बेळगाव live देखील ज्योती पाटील ला आर्थिक मदत करा अस आवाहन करत आहे
ज्योती पाटील हिला मदत करण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्यांना मदत द्यायची आहे, त्यांनी ज्योतीची आई लक्ष्मी जगन्नाथ पाटील यांच्या बॅंक ऑफ इंडियाच्या 111010510000092 अकाऊंटवर किंवा थेट मोबाईल क्रमांक +918694901819 मदत करावी.