माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष बी येडियुराप्पा यांनी स्थानिक भाजपच्या कानपिचक्या घेतल्या आहेत.काल बुधवारी पूर्ण दिवस येडी बेळगाव शहर दौऱ्यावर होते .कार्यक्रमाचे संयोजन बरोबर नव्हते गर्दी जमवण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आलं आहे यावरून त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांचा क्लास घेतला आहे अशी माहिती मिळाली आहे.
येडी मुख्यमंत्री असतेवेळी कार्यकाळात शहराला 200 कोटी निधी दिला होता असे असताना शहरातील दोन्ही भाजपच्या जागा का पराभूत झाल्या याची कारणमीमांसा विचारत मागील विधान सभेतील पडीक उमेदवारांना तिकीट का ध्यावं याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष अमित शाह यांना द्यावं लागेल अशा शब्दात येडींनी सुनावले आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी बेळगावातील कॉंग्रेस आणि समिती बरोबर अंडरस्टेडींग पॉलिटिक्स करू नये अन्यथा गय केली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी स्थानिक नेतृत्वाला दिला आहे.
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अनेक दिगगज लोक भाजपात येणार आहेत जुने देखील इच्छुक आहेत अश्यात नवीन चेहऱ्यांना देखील संधी उपलब्ध झाली आहे.