शाळा सोडलेल्या मात्र नशिबाच्या जोरावर यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या अनेक यशोगाथा आहेत, यूपीएससी परीक्षेत ६८८ वा रँक घेतलेल्या लक्कप्पा हनुमन्नावर ची कथाही अशीच प्रेरणा देणारी आहे. स्वयंप्रेरनेतून किती मोठे यश मिळविता येते हेच लक्कप्पाने दाखवून दिले आहे.
जागनूर या चिकोडी तालुक्यातील गरीब घरात लक्कप्पा जन्मला. शेतात मजुरी करून त्याचे भाऊ घर चालवितात. त्यालाही याच कारणासाठी शाळा सोडावी लागली. तो शेतमजूर म्हणून काम करीत होता, शिक्षणाची ओढ असूनही दुसऱ्यांच्या शेतात ऊस तोडणी कामगार म्हणून त्याने काम केले.
घरची एक एकर जमीन असूनही दुष्काळाने काही चालना, म्हणून अर्धा एकर विकली गेली, यानंतर लक्कप्पाने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले, यामुळे वडिलांनी त्याला पुन्हा शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनी सरकारी हॉस्टेल मध्ये राहून शिकण्याचा सल्ला दिला, कारण तेथे अभ्यासाबरोबर दोन वेळच्या जेवणाची सोय होणार होती, पुढे मजलत्ती येथील सरकारी कॉलेज येथे व पुढे धारवाड कृषी विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले.
मागीलवेळी यूपीएससी त त्याची संधी हुकली होती, यावेळी मात्र ६८८ रँक घेऊन त्याने आपल्या आई वडिलांबरोबरच तालुका आणि जिल्ह्याचेही नाव रोशन केले आहे.
त्याच्या जिद्दीला आणि पालकांनी दिलेल्या साथीला बेळगाव live चा सलाम.