कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार करतायत,मराठी माणसाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, हे मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार नाही असा टोला शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सीमावासीयांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या राजकीय धोरणांवर बोलताना सीमावासीयांचा विसर पडू न देता त्यांनी आपला पाठिंबा सीमाप्रश्नाला कायम ठेवला असून सीमाबांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकाचाही समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारलाही त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत सुनावले आहे हे सरकार सीमावासीयांच्या पाठीशी राहणारे नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका असेही ते म्हणाले