टाळ्ण्यासाठी पाऊस वेळेत येण्यासाठी झाड लावणे हा एकच पर्याय आहे त्यामुळे झाड लावा देश वाचवा अशी घोषणा देणे गरजेचे आहे असं मत भाजप सचिव पांडुरंग धोत्रे यांनी व्यक्त केलं आहे.
आदर्श नगरश्रीराम कॉलनी येथील स्वराज्य शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने श्रीराम कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते आर एस एस प्रांत व्यवस्थापक लक्ष्मण पवार भाजप महानगर अध्यक्ष राजेंद्र हरकुनी,भाजप नेते डॉ दोडमनी, नगरसेवक दीपक जमखंडी,श्रीकांत पाटील उपस्थित होते. राहुल मयेकर यांनी स्वागत केलं तर एस आर चौगुले यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी देवकुमार बिरजे, प्रवीण शहापूर आदी उपस्थित होते
एन सी सी तर्फे वन महोत्सव
28 कर्नाटक एनसीसी बटालियन हुबळी यांनी आयोजित प्रशिक्षण शिबीर जाधव नगर येथे झाले. शिबिराचे एक भाग आज बेळगाव आणि धारवाड परिसरातील कडेटनी वनखात्याच्या सहकार्याने नेचर कॅम्प मध्ये वृक्ष लावले आहेत. डी.एफ.ओ. श्री बी व्ही पाटिल, एसीएफ शिवानंद नाईकवाडी, आरएफओ नागराज बालेहोर, कमांडिंग ऑफिसर कर्नल विवेकानंद, पर्यावरणवादी लिंगराज जगजींपी आणि अमृथ चरांतीमठ उपस्थित होते.
या दोन विभागांचे अधिकारी आणि सुमारे 60 कॅडेट्स यांनी 100 पेक्षा अधिक वृक्ष लागवड केली.