डोळ्यात मिरची पुड टाकुन व्यापाऱ्यास 12 लाख रुपये रोख रक्कम लुटलेल्या टोळीस बेळगाव शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी पकडलं आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 1 जून रोजी रात्री 10 च्या दरम्यान किर्लोस्कर रोड येथे अनिल पोरवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यास लुटले होते .पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांच्या टोळक्यास अटक केली असून त्याच्या जवळील 9.88लाख रक्कम जप्त केली आहे.
किरण मदानावर 27, रवी तलवार 28,जोतिबा हांचीमनी 22,अनिल फडेंनावर 19आणि राजेश वरूर 19 सर्वजण राहणार बेळगाव अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.तर मललेश बुडरी एक आरोपी फरारी असून त्याचा तपास पोलीस करताहेत.सी सी बी पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर आणि माळ मारुती चे निरीक्षक केशव टेंगरीकर पत्रकार परिषदे वेळी उपस्थित होते. व्यापारी अनिल पोरवाल यांच्यावर पाळत ठेऊन लुटण्याचा उद्देशातून हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे
असा लागला छडा
बेळगाव पोलिसांनी शहरात बसविलेल्या नवीन एच डी कॅमेऱ्या मूळ आणि नियंत्रण कक्षा मूळ या केस चा उलगडा लवकर झाल्याची माहिती मिळत आहे.किर्लोस्कर रोड परिसरात हाय डेफिनेशन कॅमेरे ट्राफिक नियंत्रण करण्यासाठी बसविले आहेत याचा नियंत्रण कक्ष ट्राफिक दक्षिण पोलीस स्थानकात आहे याचं कॅमेऱ्यात सी सी टी व्ही मध्ये लुटारू अडकले होते त्यानुसार पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे.