अखेर स्मार्ट सिटी कामांचा श्री गणेशा
बेळगाव शहराचं नाव स्मार्ट सिटी योजनेत सामील होऊन वर्ष उलटलं तरी अद्याप शहरात काम सुरू झाली नव्हती मात्र पालिका आयुक्त शशिधर कुरेर ही काम सुरू करण्यात यशस्वी झाले आहेत.राज्य आणि केंद्राने प्रत्येकी 200 कोटी अनुदान मंजूर केल्या नंतर पहिल्या 76 कोटी च काम सुरू झालं आहे.
पालिका व्याप्तीत सर्व कामावर नजर ठेवण्यासाठी कमांड कंट्रोल निर्माण करण्यासाठी 76 कोटी च्या कामाची निविदा मागवण्यात आली आहे. हिंडलगा पंप हाऊस जवळील जागा यासाठी निश्चित करण्यात आली असून हे काम सुरू झालं आहे.
स्मार्ट सिटीच्या कामा सह पाणी पुरवठा वीज पुरवठा पार्किंग आणि स्वच्छता यासह अन्य कामावर कमांड कंट्रोल रूम ची नजर असणार आहे.