सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर खासदार सुरेश अंगडी यांनी संसदेत कितीवेळा तोंड उघडले हे माहीत नाही. खासदारांना विमानतळावर मान आणि आदर मिळावा या मागणीसाठी मात्र त्यांनी बाजू मांडलीय. याची सगळीकडे चर्चा आहे.
खासदार विमानतळावर आले की दखल घेतली जात नाही. त्यांचे स्वागत होत नाही, असा आरोप त्यांनी अधिकारीवर्गावर केलाय. आता बघू काय होते आणि खासदारांचे विमानतळावर स्वागत होते की नाही!
खासदार कोठूनही आले की त्यांना मदत करण्यासाठी प्रोटोकॉल अधिकारी असतात. मात्र ते काम करत नाहीत. असाही आरोप केला आहे
खासदार अंगडींनी यापूर्वी कधीच सामान्य नागरिकांची बाजू संसदेत मांडली नाही. खासदार म्हणून मान मिळावा यासाठी मात्र ते बोलले असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
गुरुवारी सकाळी तेलगू देसम पार्टीचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमान तळावर बोर्डिंग पास न दिल्याने इंडिगो कँपनीच्या कर्मचाऱ्या बरोबर वाद घातला होता त्या नंतर खाजगी विमान कँपन्यांनी रेड्डी वर बंदी घातली होती त्याच पाश्वभूमीवर अंगडी यांनी हा मुद्दा टाइम्स नाऊ या खाजगी वृत्त वाहिनीएकडे केला आहे. आंध्रप्रदेश चे गजपती राजू हेच नागरी विमान उड्डाण राज्य मंत्री आहेत.