आज एकीकडे मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी राजीनामा दिला तर दुसरीकडे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी माजी मुख्यमंत्री बी एस येडी युराप्पा यांची भेट घेतली आहे.चिकोडी येथील एका शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शिवाजी सुंठकर आणि तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी बी एस येडीयुराप्पांची भेट घेतल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे.
आमदार महंतेश कवटगीमठ यांच्या पुढाकारातून सुंठकर यांची येड्डी भेट घडवून आणण्यात आली आहे.
गडकरी यांचा मराठी भाषिक युवा आघाडीच्या अध्यक्ष पदाचा राजीनाम्या नंतर सुंठकर यांची येडीयुराप्पा भेट समिती मधली दुसरी मोठी घडामोड आहे.
बेळगाव ग्रामीण किंवा उत्तर मधुन भाजपचे उमेदवारी साठी ही भेट झाली असावी अशी देखील माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसापासून सुंठकर हे भाजपच्या संपर्कात आहेत ही माहिती चर्चेत होती खासदार सुरेश अंगडी आणि प्रभाकर कोरे यांच्या संपर्कात असलेले सुंठकर हे आज येडीयुराप्पांना भेटले आहेत त्यामुळं सुंठकर यांच्या भाजप एन्ट्री ची चर्चा देखील जोरात सुरू आहे
ते लवकरच भाजपात जातील अशी चर्चा आहे. ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांनी त्यांना उत्तरेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे कळते. सुंठकर हे समितीचे कार्यकर्ते आहेत. माजी महापौरही आहेत. त्यांनी समिती सोडणे हे त्यांच्या निष्ठतेवर घाला घालणारे असेल आणि ते समितीचे असल्याने कर्नाटक विरोधी असून त्यांना भाजप मध्ये घेणे हे ही भाजपला त्रासाचे ठरू शकते.