बेळगाव पालिकेत हाताच्या बोटावर मोजता येणार नगरसेवक भ्रष्टाचारावर बोट ठेऊन अगदी पोटतीडीने लढत असतात त्यापैकीच एक विनायक गुंजटकर आहेत . सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक हे आपल्या नगर सेवका पदाच्या पहिल्याच कारकिर्दीत चमकले आहेत . आगामी २४ जून रोजी स्थायी समितीच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे , यात त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे.
सत्ता मराठी भाषिक गटाकडे आहे स्थायी समिती अध्यक्ष बदलणार आहेत गुंजटकर यांच्याकडे असलेले स्थायी समिती अध्यक्ष पद देखील मुदत संपल्यामुळे जाणार आहे मात्र गेल्या एक वर्षाच्या काळात गुंजटकर यांची कारकीर्द बहरली आहे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे बेधडक पणे त्यांनी बाहेर काढली आहेत शिव सृष्टी चे काम सुरु करणे असो किंवा आमदाराच्या मालकीचे रस्त्यात असलेले बेकायदेशीर शेड हटवणे असो निडर लोक प्रतिनिधी प्रमाणे कार्य करत त्यांनी धडक चालू ठेवला आहे अश्या लढवय्या नगरसेवकास हेच पद पुन्हा ध्या अशी मागणी जोर धरू लागली आहे .
मराठी भाषिक गट चालवणाऱ्या मॅनेज होणाऱ्या नी आपण नाही तरी नाही आपल्याच गटातील दुसरा नगर सेवक लढत आहे त्याला नैतिक पाठिंबा देण गरजेच आहे असा देखील मत प्रवाह समोर येत आहे . सार्वजनिक बांधकाम खात्याच अध्यक्ष पद पुन्हा विनायक गुंजटकर यांना मिळाव जेणे करून त्यांच्या भ्रष्टाचार विरोधातल्या लढाया चालतील . मराठी गट चालवणाऱ्या नेत्यांनी याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे .