जय महाराष्ट्र लिहिण्यात आलेली पहिली एस टी बेळगावात दाखल झाली त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी बस ला हार घालून स्वागत केले तसेच बसचे द्रायव्हर आणि कंडकटर यांना पुष्प गुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं.यावेळी मिठाई वाटप करून स्वागत फटाके फोडण्यात आले.
कर्नाटकचे नगर विकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हटल्यास लोक प्रतिनिधींच पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी दिली होती त्याला प्रत्त्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक एस टी वर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल अशी घोषणा केली होती त्या प्रमाणे आज सकाळी मुंबई हुन निघालेली मुंबई बेळगाव बस ( Mh20 जी एल 3958) दहाच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोचली.समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर,कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले. यावेळी समिती कार्यकर्त्यानी बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे , जय महाराष्ट्र घोषणेसह सारा परिसर दणाणून सोडला.सातारा बस एस टी डेपो चे बस चालक प्रमोद गायकवाड आणि वाहक देविदास मोरटे यांचा भगवा फेटा घालून सत्कार केला.
Jai Maharashtra