तुमच्या स्वप्नांची झोप पूर्ण व्हायला देऊ नका इतकी मेहनत करा कि यश तुमच्या जवळ येईल समाजाची आमच्यावर जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायलाच हवीत. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला हवेत अस मनोगत यु पी एस सी मध्ये देशात प्रथम क्रमांक घेणारी नंदिनी के आर हिने व्यक्त केल आहे .
सुवर्ण विधान सौध मध्ये गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ती बोलत होती.बेळगाव जिल्ह्यातील होस्टेलसह इतर दहावी आणि बारावीत ९०% गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला . सुवर्ण सौध मध्ये झालेल्या सत्कार समारंभात प्रत्येक विध्यार्थ्यास दहा हजारांचा चेक वितरीत करण्यात आला .
हॉस्टेल मध्ये शिकून भावी जीवानात अधिकारी पदावर रुजू होऊन या विध्यार्थ्यांच्या हातून साम्जासेवा घडावी अशी प्रस्तावना जिल्हाधिकारी एन जयराम यांनी केली .हॉस्टेल मध्ये शिकून आय ए एस उत्तीर्ण झालेला लकाप्पा हनमन्नावर याने आपल शिक्षण अर्धवट सोडून मला शिकवलं अश्या माझ्या भावाचा त्याग माझ्या यशा मागे आहे या शिवाय माझ्या गावातील अनेकांनी मला मदत केली आहे अश्या भावना मांडल्या . खासदार सुरेश अंगडी , कन्नड साहित्यिक सरजू काटकर यांनीही आपले विचार मांडले.