बेळगाव शिव बसव नगर येथील नागनुर रुद्राक्षी मठाच्या वतीनं जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.बुधवारी 21 जून रोजी सकाळी 10:30 वाजता एस जी बाळेकुंद्री इंजिनियर्स ऑफ टेक्नॉलॉजी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
समाजिक कार्यकर्त्या पद्मावती अंगडी यांच्या स्मरणार्थ नागनुर मठात या दिवशी महिला संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. बंगळुरू येथील सामाजिक कार्यकर्त्या विजया लक्ष्मी बाळेकुंद्री यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. विजापूर येथील ज्ञानयोगाश्रम सिद्धेश्वर स्वामीजींच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे.