पक्षासाठी कोणतेही मोठं योगदान नसताना कार्य नसताना ब्लॅकमेल करून सतीश जारकीहोळीनी मोठं पद मिळवलं आहे असा आरोप माजी के पी सी सी सदस्य शंकर मुनवळळी यांनी केला आहे.
शहरातील काही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमाने सत्तेत आलाय मात्र नेते कार्यकर्त्याना पक्षात स्थान देत नाहीत.पक्षासाठी मुस्लिम,ढोर, भंगी,भोवी या समाजाचे लोक राबलेत त्यांना का स्थान दिला नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष हा जारकीहोळी बंधुची घरची संपत्ती नाही ती कार्यकर्त्यांची प्रॉपर्टी आहे त्यामुळं राज्यातील नेत्यांनी ही चूक सुधारावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात 18 विधानसभा निवडणुकीत निष्ठावन्त काँग्रेस म्हणून निवडणूक लढवू असंही ते म्हणाले.
ज्यावेळी बेळगावात प्रभारी माणिक टागोर आले होते तेंव्हा मुनवळळी काँग्रेस चे नव्हे म्हणून त्यांची दिशाभूल स्थानिक नेत्यांनी केली आहे असं असेल तर काँग्रेस भवन बांधायला माझ्या कडून अडीच लाख रुपये वर्गणी का घेतली असा प्रश्न देखील त्यांनी केला.भविष्यात काँग्रेस नेते सुधारले नाहींत तर उत्तर कर्नाटकातील 56 विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध काम करून निवडणूक लढवू असंही ते म्हणाले.
Trending Now