शाळा सुरू होऊन 20 दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्यापही शहर आणि तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तके मिळाले नाहीत.
शाळा सुरू होण्याआधी पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्याचे दरवेळेचे आश्वासन यावेळीही फुसके ठरले आहे. परिणामी विद्यार्थी पाट्यपुस्तक विना शाळेला जात आहेत. शिक्षण खात्याच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांतून आणि पालकातून संताप व्यक्त होत आहे शासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे .
शासनाने या विद्यार्थ्यांना त्वरित पाट्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत. नाही तर पालकांच्या माध्यमातून तीव्र आदोलन छेडन्यात येईल असा इशारा सुनील जाधव यांनी बेळगाव live कडे दिला आहे