बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालय निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने 6.5 कोटी अनुदान मंजूर केलं असून लवकरच जागा अंतिम करून इमारत बांधण्यास सुरू केली जाईल अशी माहिती राज्य पोलीस महासंचालक रूपककुमार दत्ता यांनी दिली.
एका दिवसाच्या बेळगाव दौऱयांवर आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
बेळगाव जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता नवीन पोलीस स्टेशन साठी प्रस्ताव आले आहेत राज्यात बिट सिस्टम ला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिसांना मोबाईल सिम कार्ड देण्यास गृह मंत्री अनुकूल आहेत लवकरच सिम कार्ड इतर खर्च आणि गाडी देण्यात येईल अशी देखील माहिती दत्ता यांनी दिली आहे.
आठवड्यातून एकदा सुट्टी द्या असे आदेश सर्व जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्याना देण्यात आले असून सुट्टी देणं शक्य नसल्यास त्या दिवशीचा अधिक भत्ता पोलिसांना द्या अशी सूचना दिली आहे असंही ते म्हणाले.
डुप्लिकेत पासपोर्ट बनवणाऱ्यावर कारवाई
बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न अति संवेदनशील असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आहे.अजून किती बांग्लादेशी घुसखोर बेळगावात आहेत याचा तपास सुरू असून डुप्लिकेत पासपोर्ट तयार करण्यास मदत केलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.