अंजुमन सभागृहात झालेल्या चंद्र दर्शन कमिटीच्या बैठकीत उध्या सोमवारी बेळगावात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुस्लिम समाजातील मौलवी नेते आणि अंजुमन पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत बेळगावात सोमवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई दिल्ली आणि बंगळुरू येथील चांद समिती नेत्यांना संपर्क साधून चंद्र दर्शन बद्दल माहिती मिळवली आहे सोमवारी ईद उल फित्र रमजान उध्या सोमवारी करण्याचा निर्णय घेतला आहे
अंजुमन हॉल शेजारील ईदगाह मध्ये सोमवारी सकाळी 9 :30 वाजता सामूहिक नमाज पठण होणार आहे. बैठकीत मुफ्ती अब्दुल अजीज,मुफ्ती मंजूरआलम, मुफ्ती हाफिज बशीर, कटगेरी हजरत, समिऊलला माडीवाले,राजू सेठ आदी उपस्थित होते