अमरावतीचे पत्रकार प्रशांत कांबळे वर झालेल्या पोलिसी अत्त्याचाराचा निषेध बेळगावातील पत्रकारांनी केला आहे. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे सुहास हुद्दार आणि पत्रकार विकास अकादमी चे प्रसाद प्रभू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. बेळगाव live देखील प्रशांत च्या पाठीशी आहे.
” दो नैना और एक कहाणी” …थोडासा बादल, थोडासा पाणी..और एक कहाणी…..ऐकाव असं गाणं आहे मासुम या चित्रपटात..या तरुण पत्रकाराचे हे दोन छायाचित्र, त्यातील प्रशांतचे डोळे खूप वेगळी कहाणी सांगतात..दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हातून पुरस्कार घेतांनाचा हे पाहिलं छायाचित्र बघा..त्यात त्याचे डोळे आता जग कवेत घेणार असा निर्धार दाखवताहेत….तर दुसऱ्या छायाचित्रात असहाय, आणि हातात बेड्या असलेला प्रशांत उपचार घेतोय..त्याचे डोळे बघा..ते आपल्याला अलगदपणे अंधाराकडे नेतात..अपल्यापुढच्या अंधाराची हलकीशी चाहूल देतात….तो हरतोय… मात्र या उमद्या पत्रकाराला आपण कुठल्याही परिस्थिती जिंकून द्यायचं आहे…