डॉ माधव प्रभू …..हे नाव साऱ्यांनाच माहीत आहे. केएलई संस्थेत डॉक्टरी करणारा रुग्णांना बरे करणारा डॉक्टर ही आणि इतकीच त्यांची ओळख नाही. गरीब कष्टींसाठी विचार करणारा आणि त्यासाठी झटणारा डॉक्टर ही त्यांची ओळख आहे. स्वतः झटून तयार केलेल्या प्यास फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी ही ओळख तयार केली आहे, दुष्काळग्रस्थाना पाणी मिळावे आणि मुळात दुष्काळच पडू नये यासाठी ते स्वतः झटत आहेत म्हणून ते बेळगाव live चे आठवड्याचे व्यक्तिमत्व बनले आहेत.
उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला की तहान कशी जीवघेणी ठरते हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून माधव यांनी प्यास घालविण्यासाठी प्यास फौंडेशन काढले. काही कार्यकर्त्यांना जमवून मात्र त्यांच्यावरही भरोसून न राहता स्वतः पुढाकार घेत त्यांनी नियोजन केले आहे. यामुळे एक दोन वर्षात भल्यामोठ्या तलावांना पुनरुज्जीवन देण्याचे काम त्यांनी साध्य करून दाखवले आहे.
सुळगे, येळ्ळूर, कित्तूर येथील तलाव आणि केळकर बागेतली एक जुनी विहीर घेऊन त्यांनी पाण्याचे व ते पुरवणाऱ्या माध्यमांचे शुद्धीकरण केले आहे. हे करताना त्यांनी प्रसंगी पदरमोड केली, काहीवेळा देणग्या जमवल्या आणि अनेक प्रकल्प साध्य करून दाखवले.
डॉक्टर म्हणून रुबाबात न फिरण्यापेक्षा मातीत हात घालून काम करण्याचा मोठेपणा त्यांच्यात आहे.
प्यास एवरी ड्रॉप्स कौन्ट म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा हे ओळखून अलीकडेच मे महिन्याच्या 2016 मध्ये प्यास फौंडेशन ही संघटना स्थापन केली होती केवळ एका वर्षात तीन तलावाची खुदाई तसेच 50 हजार लोकांना सलग दोन महिने टँकर ने पाणी पुरवठा केला दोन विहिरीचं पुनरुज्जीवन हाती घेतले आहे तर जवळपास दहा हजार झाड लावली आहे पाणी अडवा पाणी जिरवा राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत हे सगळं केलं आहे सरकार कडून एक रुपयांचा निधी न घेता केलेलं आहे.
प्यास बुझवण्यासाठी माधव प्रभू समाजातील अनेक क्षेत्रातील टीम लाभली आहे अश्या या अवलीयाच्या तहान भागवण्याच्या कार्यास बेळगाव live कडून शुभेच्छा..
डॉ माधव प्रभु ,प्यास फाऊंडेशन
मोबाइल 09738462380