सोशल मिडीयावर मराठी साठी काम करणाऱ्या तरुणांची संख्या भरपूर आहे अनेक जन कार्यरत आहेत अश्याच अनेक कार्यकर्त्या पैकी एक नाव आहे सुनील जाधव … सध्या सोशल मिडीयावर १५० हून अधिक whats app ग्रुप चा admin असलेल्या सुनील ने मराठी साठी जन जागृतीचा सपाटाच सुरु केला आहे म्हणून तो बेळगाव live चा आठवड्याचे व्यक्तिमत्व बनला आहे . सुनील सारखे अनेक युवक सोशल मिडीयावर काम करण्यासाठी पुढे आले पाहिजेत म्हणून मुद्दाम बेळगाव live ने युवकांना देखील या पर्सनॅलिटी ऑफ द वीक मध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठीसाठी काही तरी करायची तळमळ सतत समितीच्या नेत्यांच्या सम्पर्कात राहून जन जागृती करणे मराठा समाजाच्या शिक्षण असोत किंवा आणखी काही समस्या निवेदन देणे ,गणेश उत्सव आणि शिव जयंती उत्सवात देखील जन जागृती करणे असे काम करणारा सुनील जाधव हा बेळगावात उसाभरी करणारा कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे .
मराठी विरोधी काम करणाऱ्या इतर राष्ट्रीय पक्षांनी देखील सुनील च्या कार्याचा धसका घेतला यामुळे याचेवर पोलीस दलाची सुद्धा सुनील वर नजर आहे .
महाराष्ट्रात मराठा मोर्चे यशस्वी झाल्यावर बेळगावात मराठा मोर्चा काढू म्हणून सर्व प्रथम शहर पिंजून काढणाऱ्या भागोजी पाटील माजी नगरसेवक अनिल पाटील आणि सुनील जाधव हे या त्रिकुटा पैकी एक आहेत . मराठा मोर्चा सीमा प्रश्नांचा ठराव घेऊन काढण्याचा निर्णय झाल्यावर सकल मराठा समाजाचे संयोजक गुणवंत पाटील यांच्या सह जन संपर्क अभियान राबवण्यात सुनील जाधवचा मोलाचा सहभाग होता.
मराठीसाठी गेली १० वर्षा हून अधिक काळ सुनील कार्यरत आहे सरकारी कार्यालये शाळा कोलेजीस मधून प्रवेश इतर माहिती युवकांना मिळवून देणे असे कार्य तो एकटा करत असतो . मराठी माणसाच्या समस्या असुदेत किंवा आणखी काही एकीकरण समिती साठी जनजागृती करणारे अनेक कार्यकर्ते ते आपापल्या परीने जनजागृती करत असतात त्यापैकीच एक कार्यकर्ता असा आहे की ज्याने आपल उदर निर्वाहाची देखील अधिक परवा न करता स्वता जास्तीत जास्त मराठी साठी काम करायला स्वतःला वाहून घेतल आहे . कुठलीही समस्या असली कि कुणी नेते सोबत येतील किंवा नाही याची परवा तो करत नाही एकटा जातोच किंवा सोबत मिळेल त्याला घेऊन निवेदने देणे असे कार्यक्रम करत त्याने आपली इमेज स्वयंभू बनविली आहे म्हणून अनेक समिती नेते आणि कार्यकर्त्या बरोबर त्याच विस्तुष्ट आहे .अनेकांना आपलं पटत नाही राजकीय विरोधक खूप आहेत तरी देखील १५० हून अधिक व्हाट्स अप्प ग्रुप वर जन जागृती करण्याचा त्याचा प्रवास सुरूच आहे . सीमा भागातील लढ्याच्या चळवळीचा उद्देश्य युवकापर्यंत पोचवत असतो त्याच कार्य पाहून समितीचे जेष्ठ नेतृत्वाने देखील दखल घ्यायला सुरुवात केली आहे. अश्या कार्यकर्त्यास बेळगाव live कडून शुभेच्छा ….
Comment:
मी सहमत आहे
सुनील भाऊचे कार्य मी जवळून बघितले आहे
Good sunil sir keep it up