सिटीझन फोरम म्हटले की अनिल देशपांडे आठवल्याशिवाय राहात नाहीत. अनिल देशपांडे हे समाजासाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व आहे. निवृत्तीचा काळ सुखा समाधानाने व्यतित करण्याचे त्यांचे स्वप्न नाही यामुळेच ते सतत राबत राहतात, तरुणांना समाजकार्याची प्रेरणा देत राहतात.
त्यांचा जन्म 1951 चा. 1986 मध्ये त्यांनी किंग कोब्रा ही सिक्युरिटी एजन्सी सुरू केली होती. अनेक राज्यात त्यांनी या संस्थेचा विस्तार वाढविला, त्यानंतर खाद्यपदार्थ वितरणाच्या व्यवसायात ते होते. कामात व्यस्त असतानाही समाजसाठीची त्यांची तळमळ कायम होती.
2009 मध्ये त्यांनी सिटीझन फोरम ची स्थापना केली. समाजात काहीही चुकीचे दिसले की आवाज उठवायचा हे त्यांचे काम. प्रशासकीय दुर्लक्ष, सर्व सामान्यांवर अन्याय आणि पायाभूत नागरी समस्या याविरोधात त्यांनी केलेली कामे मोठी आहेत.
मागील वर्षी राकस्कोप तलावात साचलेल्या गाळाविरोधात त्यांनी आवाज उठविला, यामुळे प्रशासनाला दखल घ्यावीच लागली. अनेक सामाजिक सेवा संस्थांना ते मदत करतात. शांताई वृद्धाश्रम, आर्ष विद्या केंद्र, घरकुल वृद्धाश्रम सारख्या संस्थांना त्यांनी भरगोस मदत केली आहे.
ते 66 वर्षांचे आहेत, मात्र त्यांची धडपड तरुणालाही लाजवणारी आहे. यामुळे ते बेळगाव live चे आठवड्याचे व्यक्तिमत्व ठरतात.