सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गा शेजारील 500 मीटर अंतरावरील दारू दुकान आणि बार ना स्थलांतरित करण्यासाठी अबकारी उपायुक्तांनी नोटीस जारी केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात हायवे शेजारी 426 दारू दुकान आहेत या सर्व दुकानांना 30 जून मध्य रात्री पर्यंत स्थलांतर करण्याचा आदेश नोटिशी द्वारे बजावण्यात आला आहे.महाराष्ट्र गोवा सीमेवरील हायवे वर स्टेट हायवे वर दुकानाची संख्या अधिक आहे.30 जून पर्यंत सर्व दुकान शिफ्ट न केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा देखील अबकारी उपायुक्तांनी दिला आहे.बेळगाव खानापूर रोड, हायवे आणि इतर राज्य महा मार्गावरील दारू दुकान आता शिफ्ट होणार आहेत