1995 नंतरच्या मराठी शाळांना अनुदान मंजूर करावे अशी मागणी मध्यवर्ती एकीकरण समितीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
1995 नंतर मराठी शाळातील शिक्षक विना वेतन काम करत आहेत या शाळातील शिक्षकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत अश्या शाळांना महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावं अशी मागणी मध्यवर्ती समितीने केली आहे
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या सह शरद पवार,उद्धव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील,विनोद तावडे, धनंजय मुंढे, चंद्रकांतदादा पाटील याच्या कडे पत्र लिहून केली आहे.