शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्यायी ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था विकसीत करण्यात येणार आहेत,अशी माहिती महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिली आहे.
महापालिका कार्यालयात आज वाहतूक समस्या आणि विविध विषयावर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे, शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार काही भागातील अतिक्रमण काढून रस्त्याची रुंदी वाढविली आहे, तरी वाहतूक कोंडी कायम आहे.त्यासाठी शहर आणि शहर परिसरातील बुडा, कॅम्प आणि महापालिकेच्या जागा निश्चित केल्या असून तिथे वाहन पार्किंग व्यवस्था करून दिली जाईल. त्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती कुरेर यांनी दिली आहे.
बैठकीत वाहतूक प्रश्नावर अनेकदा बैठक झाल्या आहेत.पण त्याची अंमलबजावणी झाली नाही, शहरात बस थांब्यावर बसेस योग्यरीत्या थांबविल्या जात नाहीत, यातुन मार्गावर वाहतूक कोंडी होते, या वाहतुकीवर उपाय म्हणून रामदेव गल्ली, बापट गल्ली आणि बोगार वेस येथे वाहन पार्किंग व्यवस्था विकसित केली जावी.
पोलीस प्रशासन या संदर्भात खूप प्रयत्न करते, जनतेने त्याला सहकार्य द्यावे ही समस्या सोडविण्यासाठी ट्रॅफिक मिशन योजनेला पुढील आठवड्यात चालना देत आहे. त्यानंतर मोठी वाहतूक समस्या कमी होईल, असे पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले.
महापौर संजोत बांदेकर यांनी शहरात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठका झाल्या आहेत. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. यानंतरही वाहतूक सुधारली नाही, असा आरोप केला.
कुरेर यांनी शहरात काही शिक्षण संस्थांना पार्किंग व्यवस्था सुधारून घेण्यासाठी वेळ दिला आहे.मात्र त्यानंतरही शाळा आणि कॉलेजच्या रस्त्यावर पार्किंग केले जात आहे त्याविरुद्ध कारवाई केली जाईल,असा इशारा दिला .बेठकीला माजी महापौर सरिता पाटील, नगरसेवक दीपक जमखंडी, एसीपी शंकर मारीहाळ, लक्ष्मी निपाणीकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.