कन्नड भाषा आणि भाशिकाबद्दल मराठी भाषिका मध्ये द्वेष नाही परंतु कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिका संदर्भात जो छळ मांडला आहे तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे . एकाद्या समूहाचा सांस्कृतिक विध्वंस करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे आणि तो सरकारच्या माध्यमातून शासनाने ने अवलंबला आहे . अश्या शब्दात मराठी भाषिक युवा आघाडीने स्वामीजींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काल सुवर्ण विधान सौध मध्ये गदगच्या तोटदाचार्य सिद्धलिंग स्वामीजीनी एकीकरण समिती आणि नेत्यावर तोंडसुख घेतले होते. महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिक युवा आघाडीने या वक्तव्याचा निषेध न करता देव त्यांना सद्बुद्धी बहाल करो अशी प्रार्थना केली आहे.