सतत मराठी भाषिकांना डावलून गळचेपी करणारे जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या बदली करण्यासाठी समितीच्या सर्व लोकप्रतिनिधी नी एकत्रित येऊन आंदोलन करा असा सल्ला सीमा प्रश्नासाठी गेली 50 वर्षाहून अधिक काळ पण करून पायात चप्पल न घालणारे सीमा तपस्वी मधु कणबर्गी यांनी दिला आहे.
एन जयराम गेली 4 वर्षाहून अधिक काळ बेळगाव मध्ये मराठी आणि समितीच खच्चीकरण करण्यासाठीच बेळगावात आहेत अश्यात समितीचे दोघे आमदार जिल्हा पंचायत सदस्य तालुका पंचायत सदस्य महापौर नगरसेवक आणि ग्राम पंचायत सदस्यांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं असं देखील सल्ला समिती नेत्यांना दिला आहे.
दोन आमदार महापौर इतर महत्वाची पद मराठी माणसाकडे आहेत त्यामुळे लोकशाही मार्गातून आंदोलन केल्यास यश मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी बेळगाव live कडे नोंदवली आहे.
नेमक्या काय आहेत मधु कणबर्गी यांच्या भावना पहा खालील व्हिडियो करा लिंक क्लिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=447478722276393&id=375504746140458