जिल्हा पंचायत सदस्येच्या मुलाने माजी जिल्हा पंचायत सदस्यास मारहाण केली असल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्राम पंचायतीसमोर घडली आहे.
भाजपच्या पिरनवाडी जिल्हा पंचायत सदस्यांचे चिरंजीव संतोष जैनोजी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सदस्य रमेश करेंनावर यांना मारहाण केल्याची घटना मच्छे ग्राम पंचायती जवळ घडली आहे. रमेश यांना संतोष यांनी पंचायती जवळ बोलावले आणि 8 ते 10 जणांच्या ग्रुप ने मारहाण करून शिवीगाळ केल्याची फिर्याद ग्रामीण पोलिसांत रमेश यांनी दाखल केली आहे.
संतोष हे मच्छे येथील माजी आमदार समर्थक आहेत तर रमेश हे मागच्या टर्म ला समितीतून जिल्हा पंचायतीचे सदस्य होते.अनेक वादग्रस्त भ्रष्टाचाराच्या कारणा मूळ मच्छे ग्राम पंचायत वादात आहे.