जय महाराष्ट्र लिहिलेल्या बस चे जल्लोषी स्वागत केल्यानंतर बस स्थानकावर असलेल्या मार्केट पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांना भगव्या फेट्याची कावीळ झाल्याचं दिसून आलं आहे.एस टी स्थानकात दाखल करणारे ऐतिहासिक बसचे चालक साताऱ्याचे प्रमोद गायकवाड आणि वाहक देविदास मोरटे यांचा बेळगावातील मराठी प्रेमींनी भगवा फेटा परिधान करुन सत्कार केला. हा सत्कार झाल्यावर पोलिसांनी त्या चालक आणि वाहकांची चौकशी केली परिधान केलेला भगवा फेटा काढायला लावला.कुणी कोणते वस्त्र घालावे यावर देखील निर्बंध आणण्याचा प्रयत्न बेळगाव पोलीस करत होते.
या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले होते.
Trending Now