Saturday, January 25, 2025

/

बेळगावात स्वागतापूर्वी बस स्थानकावर वाढला पोलीस बंदोबस्त तर कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

 belgaum

POlice bandobstजय महाराष्ट्र लिहिलेली महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाची बस पहिल्यांदा बेळगावला येणार पशवभूमीवर शहर बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.गुरुवारी परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस टी च्या नवीन लोगोत जय महाराष्ट्र घालून नवीन लोगोच अनावरण करण्यात आलं होतं.नवीन लोगो लिहिलेली मुंबई बेळगाव बस मुंबई हुन बेळगाव कडे रवाना झाली होती आणि शुक्रवारी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूर हुन बेळगावच्या दिशेने रवाना झाली आहे.कोल्हापूर शहरात सदर बस ची सजावट करून बसला भगवा फेटा सह परिधान करून बस ला बेळगाव कडे रवाना केले आहे.रात्री 9 च्या दरम्यान ही बस बेळगाव ला पोचणार आहे.

बेळगावातील मराठी भाषिक या बसच जोरदार जल्लोशी स्वागत करणार आहेत या पाश्व भूमीवर बेळगाव बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बस स्थानक परिसरात हळू हळू मराठी भाषिक देखील बस कधी येणार अशी विचारपूस करून जात आहेत.

कोल्हापुरात या बस च जल्लोषी स्वागत करण्यात आलं असून वाहक आणि चालकाचा भगवा फेटा बांधून स्वागत करून बेळगाव कडे रवाना करण्यात आलं आहे.यावेळी कोल्हापुरातील दिगगज उपस्थित होते.KOp busBus driver

 belgaum

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.