हुतात्म्यांच्या बलिदानास अभिवादन
१ जुन १९८६ च्या कर्नाटकी कानडी सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गुरुवारी सीमावासीयांना अभिवादन केले. या बलिदानाची चाड राखण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आज सकाळी ८.३० पासूनच कार्यकर्ते जमू लागले होते.
मध्यवर्ती, शहर आणि तालुका म ए समितीचे ,शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महापौर संज्योत बेळगावकर, सर्व मराठी नगरसेवक, आमदार संभाजी आणि अरविंद पाटील तसेच शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली .