हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाच्या जमीन संपादनाची दखल केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या भू कल्याण विभागाने घेतली असून याची संपूर्ण चौकशी करून दोषी वर कारवाई करा अशी सूचना राज्याच्या महसूल मुख्य सचिवांना दिला आहे.
या प्रकरणी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाचे अप्पर सचिव हरित कुमार शक्य यांनी कर्नाटकचे महसूल मुख्य सचिवाना पत्र लिहून हलगा सांडपाणी प्रकल्पात जमीन संपादनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करा अशी सूचना केली आहे.
बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते नारायण सावंत यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहून जमीन संपादनात झालेल्या भ्रष्टाचाराची कल्पना दिली होती त्यानुसार कृषी मंत्रालयाने याची गंभीर दखल घेऊन आपल्याच किसान कल्याण खात्याला चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्या खात्यातील चार उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी या प्रकारणाच गांभीर्य लक्षात घेऊन कर्नाटक राज्य सरकारला जन हिताच्या तक्रारीची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी आणि त्याचा अहवाल केंद्राला आणि बेळगाव शेतकरी संघटनेला पाठवावा आदेश पत्रात दिला आहे.
नारायण सावंत यांनी हलगा सांद पाणी प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी दिलेल्या लढ्यात चुकीच्या पद्धतीने भू संपादन आणि सात कोटी चा भ्रष्टाचार, १९५ एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस येणार आहे. या जमीन घोटाळ्यात अनेक राजकीय नेते अधिकारी आणि लोक प्रतिनिधी सामील असून याची चौकशी होणार असल्याने धाबे दणाणले आहेत. महा पालिका कर्नाटक पाणी पुरवठा निगम महा मंडळाचा भ्रष्ट कारभार उघडकीस येणार आहे.