ज्येष्ठ साहित्यिक आणि अनेक विद्यार्थी घडवलेले सेवानिवृत्त शिक्षक गोविंद केळकर हे पुढील वास्तव्यासाठी पुण्याला जात असल्याने विविध संस्थांच्या वतीने त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांना अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी गौरवले .प्रा. अनंत मनोहर यांनी आपल्या भाषणात त्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन त्यांनी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे अशा शब्दात त्यांचा गौरव केला.ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांच्यासह अनेक उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.अनेक वर्षे दरवर्षी विविध दिवाळी अंकांना शंभरहून अधिक कविता देणारे कवी म्हणून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे.मोत्यासारखे हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या बाबतीत ते कायम आग्रही असतात.काव्यसंग्रह,कथासंग्रह,व्यक्तिचित्रे असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.सेवानिवृत्तीनंतर लेखनाकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले.सार्वजनिक वाचनालयाचे नागेश सातेरी,सरस्वती वाचनालयाचे पी .जी.कुलकर्णी,हिंदवाडी महिला मंडळाच्या आशा मनोहर,मंथन संस्थेच्या निर्मला कळीमनी,वाग्मय चर्चा मंडळाचे विठ्ठलराव याळगी, शब्दगंध कवी मंडळाच्या अश्विनी ओगले,वसंत व्याख्यानमालेच्या माधुरी शानभाग,वि .गो.साठे प्रबोधिनीचे जयंत नार्वेकर,एल्गार कवी मंडळाचे धर्मा कोलेकर यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते.