भाजप आमदार संजय पाटील यांच्या मालकीचं रस्त्यात असलेलं गोमटेश विध्यापिठाच बेकायदेशीर शेड हटवण्यात पून्हा एकदा पालिका यंत्रणेला अपयश आलं आहे.
गुरुवारी सायंकाळी पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर यांनी कोर्टाच्या आदेश सह जे सी बी पालिकेचा अतिक्रमण विरोधी पथक घेऊन गोमटेश समोर दाखल झाले होते मात्र आमदाराच्या वजनाच्या विनंती पुढं काहीच न करता दहा दिवसाची मुदत देऊन खाली परतावं लागलं आहे.
शेड हटवण्यासाठी पालिका यंत्रणा दाखल होताच गोमटेश जवळ शेकडो बघ्यांची गर्दी जमा झाली होती यावेळी आयुक्त कुरेर यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत सादर करीत शेड हटवनार याची कुणकुण लागता आमदार संजय पाटील यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना शेड हटविण्यासाठी दहा दिवसाची मुदत मागितली शेडात ऑटोमोबाईल विधयार्थ्यांच्या मशीन असल्याने या काढण्यासाठी म्हणुन दहा दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.
एखाद्या गरीब माणसाची बेकायदेशीर संपत्ती हटवण्यासाठी इतका अवधी अधिकाऱ्यांना लागला असता का?लोक प्रतिनिधीची संस्था आहे म्हणून एकास एक न्याय आणि दुसऱ्यास एक न्याय अशीच सध्याची व्यवस्था आहे