विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे नियती फाऊंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले आहे.अपयशावर मात करा आणि आत्मविश्वास बाळगा असा व्याख्यानाचा विषय आहे. रविवार दि.११जून रोजी सायंकाळी सहा वाजता वांग्मय चर्चा मंडळ येथे रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी धर्मानंदाजी हे मराठीतून व्याख्यान देणार आहेत.
परीक्षेत अपयश,कमी गुण मिळाले,पेपर अवघड गेला,आपल्या मनासारखे होत नाही,मागितलेली वस्तू पालक देत नाहीत या आणि अशा अनेक कारणामुळे किशोरवयीन मुले आततायी मार्ग स्वीकारतात,काही जण स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेतात.अपयश म्हणजे सारे संपले असे नव्हे तर त्याच्यावर जिद्दीने मात करा असा संदेश व्याख्यानातून दिला जाणार आहे. पालकांनी देखील मुलांच्या अपेक्षा ओळखून त्याप्रमाणे त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करावे अशा बाबीवर देखील स्वामी धर्मानंद मार्गदर्शन करणार आहेत.विद्यार्थी आणि पालक यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत यांनी कळवले आहे.