पर्यावरण प्रदूषित होऊ नये यासाठी झाड लावून अनेक उपक्रम वन विभाग करत असतो मात्र इलेक्ट्रिक पोल बसविण्याच निमित्य करून हनुमान नगर येथील अनेक झाडांची कत्तल वन खात्याने केली आहे .झाडाची कत्तल करणाऱ्या वन विभागाच्या जाब विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास गुन्हा घालण्याची धमकी वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हनुमान नगर येथील व्ही आय पी लोकांची लोक प्रतिनिधींची कंपाउंड वाचवण्यासाठी 26 झाडांच्या फांद्याची कत्तल करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते सुजित मूळगुंद यांना काही कार्यकर्त्यांनी झाडांच्या कत्तलीची बाब निदर्शनास आणून देताच वन अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी उलटा चोर कोतवाल को डाटे या प्रमाणे वन अधिकाऱ्यांनी सुजित यांना गुन्हा घालण्याची धमकी दिली.जाधवनगर हनुमान नगर,या भागातल्या झाडांची कत्तल वन विभागानं केली आहे. सुजित मुळगुंद यांनी आंदोलनाचा इशारा देताच इर्शाद हवालदार नावाच्या फॉरेस्ट ठेकेदार वर गुन्हा नोंदवून वन अधिकाऱ्यांनी हा वाद इथेच शमविण्याचा प्रयत्न केला आहे
अधीकार्यांनी गैरकृत्य केल तर चालत पण तेच जनसामान्यांनी केलतर लगेच धाड टाकतात