नुकतेच एक माजी महापौर भाजपच्या आप्पाजीला भेटून आले. एका आघाडीच्या अध्यक्षाने सापत्नभावाला विरोध करीत राजीनामा दिला. त्यानंतर मध्यवर्तीच्या बैठकीत सारे मिळून काम करूया चा नारा दिला गेला, आम्हाला कुणाची गरज नाही…. आले तर सह नाहीतर शिवाय, म्हणणारे बॅक फूट वर आले. समिती माझ्या बापाची म्हणणार्याना ती माझ्याही हक्काची असे सांगावे लागले, अशावेळी समिती माझी मी समितीचा म्हणण्याची सवय कुठेतरी पाठीमागे पडली की काय असे गोंधळाचे वातावरण आहे, या वातावरणाला जे जे नेते जबाबदार आहेत त्यांनी पुढील काळात आपले वागणे बदलण्याची गरज आहे.
म ए समिती ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, ती समस्त सीमावासीयांच्या भावनेचा भाग आहे हे मानून मागील ६० – ६२ वर्षे अस्मिता जपणाऱ्या सामान्य माणसाची गत काय होईल याची जाण नेत्यांनी ठेवावी. नेते स्वयंघोषित झाले की एकाद्या संघटनेत जे होऊ शकते तेच सध्या समितीत सुरू आहे. मला मान ध्या, नाही तर मी सोडून जातो म्हणणारे वाढले की त्यांना मान का दिला जात नाही हा प्रश्न पुढे येतोच, आत्ताही तो आलाय, नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा आणि पदाचा स्वार्थ हा असा संघटनेच्या मुळा वर घाव घालत असेल तर नेतृत्वाची हार आहे.हे नक्की.
कोण किती निष्ठ आणि कोण कसा गद्दार हे जनतेला ठरवू द्या. यावर नेत्यांनीच चर्चा करायची गरज नाही. मी निष्ठ म्हणणारे किती आणि मी सोडून बाकीचे सगळे गद्दार म्हणणारे किती याचा हिशोब एकदा व्हायला हवा, साऱ्यांचे उद्दिष्ट एक असेल तर तसे मानणारे सारे आपले म्हणायला नको…? तसे न मानता स्वतःला स्वतःच एकनिष्ठतेचे सर्टिफिकेट घेऊन मोकळे होणारच सध्या समिती मोडकळीला आणू पाहत आहेत .
समितीवर साऱ्यांचा हक्क आहे. गल्लीतल्या पोरापासून सर्वांचा. नेत्यांनी त्याची जाण ठेवावी, नाहीतर समिती उध्वस्त करण्याच्या राजकीय पक्षांच्या कटात आपला सहभाग आहे, हे तरी जाहीर करून सोडावे, निवडणुकांच्या तोंडावर एकीचे बळ दाखवण्यासाठी सज्ज व्हा, कोण आप्पाजी कधीच साथ देणार नाही याची जाण ठेवा. सूर्याजी पिसाळ होण्यापेक्षा शिवाजीपण जागा आणि दुसऱ्या पुढ्यार्यांचे स्वार्थ पूर्ण करण्यापेक्षा अस्मितेचा कार्यकर्ता होऊन जगा.. . बेळगाव live चे हेच तुमच्याकडे मागणे.
It is write