वंटमुरी भागातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची पाणी पट्टी कर रद्द करावी पालिकेने राज्य सरकार ला तसा प्रस्ताव पाठवावा या मागणीसाठी नगरसेवक डॉ दिनेश नाशीपुडी यांनी अनोखं आंदोलन केल आहे
गुरुवारी महा पालिके समोर ड्रम मध्ये बसून अनोखं आंदोलन करत वंटमुरी भागातील लोकांची पाणी पट्टी रद्द करण्याची मागणी केली आहे.
वंटमुरी वसाहतीमधील कुटुंबांना राखीव निधीतून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता पाणीपुरवठा मंडळाने प्रत्येक कुटुंबाला तीन हजार रूपये पाणीपट्टी भरण्याची नोटीस पाठविली आहे.
याविरोधात नगरविकास खात्याकडे तक्रार केल्यानंतर वाढीव पाणीपट्टी प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आली आहे. पण मंडळाकडून पाणीपट्टी वसुली सुरूच ठेवली आहे, असा आरोप यावेळी नाशिपुडी यानी केला. यावेळी या भागातील नागरिक देखील उपस्थित होते.
पेशाने डॉक्टर असलेले दिनेश नाशीपुडी यांनी अनेकदा आगळी वेगळी आंदोलन करत चर्चेत असतात