बेळगाव शहरात पावसासाठी बैल पळवून त्या बैलावर भाताचे गोळे मारण्याची प्रथा आहे गेल्या कित्येक वर्षा पासून हे चालत असून वरून राजाची पूजा देखील करण्यात येते.
परंपरे प्रमाणे हनुमान नगर येथील धुपटेश्वर मंदिरात पावसासाठी वरून राजाची पूजा करण्यात आली शहरात पाऊस होऊ देत रोग राई दूर होऊ देत म्हणून गावचे पाटील रणजित चव्हाण पाटील यांनी गाऱ्हाणं मांडलं.
कंग्राळ गल्लीतील पंच मंडळींच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी महाप्रसाद देखील वितरित करण्यात आला.भाजप नेते अनिल बेनके, माजी महापौर मालोजी अष्टेकर शहर आणि कंग्राळ गल्ली पंच मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.