बेळगाव चे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी आपण भारतीय आहोत हे पहिला विसरू नये अस असताना ते जर का भारतीय भाषांचा अपमान करत असतील तर जयराम यांना बेळगावातून हाकला अशी गर्जना शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केली आहे . रविवारी शहापूर येथील गंगापुरी मठात कै नारायणराव जाधव प्रतिष्ठानचे उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाल्या नंतर बोलत होते.
जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर गुन्हे दाखल करणारे एन जयराम हे मराठीसह राष्ट्रभाषेचा अपमान करत आहेत समस्त सीमावासियांनी त्यांची हकालपट्टी करावी अस देखील ते ठणकावून म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत मी जय महाराष्ट्र म्हणणारच अस त्यांनी निक्षून सांगितल यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला .