Sunday, December 22, 2024

/

क्रिकेट बेटिंग तिघांना अटक

 belgaum

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील क्रिकेट सामन्या दरम्यान बेटिंग करणाऱ्या तिघां जणांना शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून 80 हजारांचा ऐवज आणि रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना बेटिंग ची माहिती मिळाली असता रामघाट रोड बेनकनहळळी येथील सोशल क्लब वर धाड टाकली आणि राकेश गोपाळ मासेकर रामदेव गल्ली वडगाव, चंदन कृष्णा सावंत फुलबाग गल्ली बेळगाव तर केदारी भाऊराव जाधव सुभाष गल्ली अनगोळ यांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल वरून बेटिंग घेणारे दस्तगिर मुल्ला न्यू गांधी नगर तर अश्फाक सांगली यांच्या वर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.