चिकोडी नगरपालिकेच्या सदस्याच्या पुत्राकडून झालेल्या अन्यायात पोलीस योग्य रित्या तपास करत नसल्याचा ठपका ठेवत चिकोडी येथील युवतीने चक्क एस पी ऑफिस समोर आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
शनिवारी दुपारी सदर युवती पोलिस प्रमुखांना भेटायला आली असता झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला लागलीच तिला उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
चिकोडी नगरपालिकेतील भाजपचे सदस्य सुरेश कट्टेकार यांचे चिरंजीव संजीव कट्टेकार यानें विवाहाचे लालच दाखवून अनैतिक संबंध ठेवून आपला वापर केला असल्याची तक्रार चिकोडी पोलिसांत दिली होती चिकोडी पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत सदर युवतीने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे