मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. एका जाहीर पत्रकान्वये त्यांनी ही घोषणा केली आहे.
यापूर्वीच राजीनामा देणार होतो मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे थांबलो होतो. मध्यवर्ती म ए समितीकडून युवा आघाडीला कायम सापत्नपणाची वागणूक मिळत होती. पुनर्रचना झाल्यानंतर काही फरक पडेल अशी आशा होती, मात्र तसे झाले नाही. यामुळे राजीनामा देत असून जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.