बेळगावचा माणूस आपला डंका नेमका कुठे आणि कसा गाजविला याचा नेम नाही. शहापूर बेळगावचे श्री ठाणेदार हे उद्योजक आता मिशिगन देशाचे राज्यपाल होण्याच्या शर्यतीत आहेत. ते तेथील राज्यपाल व्हावेत हीच त्यांना बेळगाव live कडून शुभेच्छा.
अनेक अपयशाचं सामना करत यशाकडे वाटचाल करणे ही ठाणेदार यांची खासियत. आपल्या ही तो श्रींची इच्छा या पुस्तकात त्यांनी हा प्रवास मांडला आहे.
१९७९ ला ते अमेरिकेत गेले. तेथील अक्रोन विद्यापीठात पॉलिमर विद्यापीठात पीएचडी केली.त्यानंतर काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतः उद्योजक बनत तेथील बंद पडले कारखाने चालवायला घेतले. आज राजकीय क्षेत्रातही ते प्रवेश करू पाहत आहेत.
शहापुरच्या मिरापूर गल्लीत ते जन्मले.गरीब कुटुंब, सहा भावंडे अशा स्थितीत त्यांना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व पटले.दहावीत त्यांना ५५ टक्के गुण मिळाले होते.
नोकरी आणि शिक्षण अशा प्रवासात त्यांनी अनेक आव्हाने पेलली आहेत. राजकारणात जातानाही आपल्या कम्पनीचे समभाग विकून त्यांनी ५० कामगारांना १.५ मिलियन $ बोनस वाटला आहे.
ठाणेदार यांच्या यशस्वी कारकिर्दीला सलाम, आणि त्यांना शुभेच्छाही. बेळगाव live.