आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने बेळगावातील हिंडलगा मुख्य कारागृह आणि गोकाक बैलहोंगल उप कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाचे धडे देण्यात आले आहेत.
15 जून ते 21 जून पर्यंत दररोज सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान बेळगावात 75पुरुष तर 40 महिलांना योगाचे धडे देण्यात आले आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे महेश केरकर,बाबू शेरीगार, दीपक धर्मट्टी यांनी पुरुष कैद्यांना तर महिला कैद्यांना राधा गुलल शोभा पै यांनी योग प्रशिक्षण दिल.
बुधवारी कारागृह अधीक्षक टी एन शेषा,डी एस पी मुलींमनी,महेश फौंडेशन चे महेश जाधव यांच्या उपास्थितीत योगा चे महत्व पटवून देणारा कार्यक्रम झाला.
गेल्या 8 दिवसात योगामुळे हिंडलगा कारागृहातील कैद्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा येणार आहे त्यामुळं पुन्हा 9 जुलै ते 16 जुलै पर्यंत स्मार्ट कैदी कार्यक्रमा अंतर्गत कैद्यांना योगा पून्हा शिकवणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग च्या राधा गुलल यांनी दिली आहे.