मतांसाठी मराठीचा जोगवा मागणाऱ्या अंगडींनी पुन्हा एकदा आपल्या कन्नड धार्जिण विधानांनी मराठी माणसाला दुखावले आहे, पत्रकार परिषद घेऊन कन्नड साठी सारे पक्षभेद विसरून एकत्र येऊया अशी वल्गना त्यांनी केली असून जिल्हाधिकारी एन जयराम यांचे गोडवे गायिले आहेत..जिल्हाधिकारी एन जयराम यांनी बेळगाव मध्ये कन्नड साठी योगदान दिल असून बेळगावात ते चांगल कार्य करत आहेत असही म्हणाले .
शुक्रवारी ही पत्रकार परिषद झाली. कन्नड धोरण राबविण्यात जिल्हाधिकारी यशस्वी ठरले आहेत, असे म्हणत आपल्याला ज्यांनी मते दिली त्या मराठी जणांशी अंगडींनी खेळच केला आहे. येथे मराठीचा उदोउदो खपवून घेतला जाणार नाही जात पात पक्ष भेद विसरून सगळ्यांनीच एकत्रित येऊया असे म्हणत काँग्रेसी पाठोपाठ भाजपही कन्नड धार्जिणे असल्याचेच त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले आहे.
मूठभर कन्नड माणसांना खुश करण्याच्या प्रयत्नात तोल गेला आणि लाखो मराठींचा रोष ओढवला अशीच त्यांची अवस्था होणार आहे. केंद्राच्या योजना अयशस्वी होण्यात राज्य सरकारचे असहकार्य कारणीभूत असल्याचे विधानही अंगडींनी केले.आगामी ६ जून रोजी माजी मुख्यमंत्री बी एस येदुराप्पा आणि खासदार श्रीरामलू बेळगाव दौऱ्यावर येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली