सांडपाणी प्रकल्पाच्या नावाखाली हलगा येथील शेतजमीन लाटण्याचा डाव केंद्रीय कृषी खात्याने गांभीर्याने घेतला आहे.
या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.
केंद्रीय कृषी खात्याचे अंतर्गत सचिव हरित कुमार शक्य यांनी केंद्र सरकारच्या भूमापन सचिवांना हे आदेश दिले आहेत.
बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले होते. बेळगावातील जमिनी भूसंपादन करून राजकीय स्वार्थासाठी हडप करून शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी नष्ट करून दुसऱ्यांदा सांडपाणी प्रकल्पा साठी हलगा येथील जमीन संपादन करण्याचा घाट घातला होता असा उल्लेख पुराव्यासह पत्रात केला होता यांची गंभीर दखल कृषी मंत्रालयाने घेतली आहे.
केंद्र सरकारने यात लक्ष घातल्याने बेळगावातील राजकीय नेते आणि संबंधित अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.नारायण सावंत यांच्या मूळ शेतकऱ्यांची बाजू मजबूत झाली आहे.