Saturday, November 16, 2024

/

कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर मध्यवर्ती करेल युवा आघाडीला विश्वास

 belgaum

marathi yuva aaghadi meetiकोणत्याही संघटनेत मन मनांतर असते मात्र ध्येयासाठी एकत्र लढा द्यावाच लागतो त्यामुळे कोणत्याही पदाची किंवा व्यक्तिगत महत्वाकांक्षेची अभिलाषा न ठेवता म ए समिती युवा आघाडीने आज पर्यंत कार्य सुरूच ठेवले आहे त्यामुळे मराठी साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे इतकी माफक आशा बाळगणे म्हणजे गुन्हा नाही म्हणून आघाडीच्या भूमिकेची कदर मध्यवर्ती समिती करेल असा ठाम विश्वास मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी व्यक्त केला .

गुरुवारी कॉलेज रोड येथील कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीत ते बोलत होते . यावेळी प्रवक्ते अरुण कानुरकर यांनी बैठकीतील वृतांत मांडला मध्यवर्तीच्या भूमिकेचे स्वागत करत अध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत करू अशी भूमिका मांडली.

विविध मराठी वृत्तपत्रातून मराठी संघटनाच्या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका मांडून कार्यकर्त्या तून संदिग्ध भूमिका तयार करण्यात येत आहेत अनेक मराठी संघटना कमी अधिक प्रमाणात सीमा लढ्यात कार्यरत आहेत त्यामुळे उपहासात्मक लिखाण करून गटा तटाचे शिक्के न मारता मराठी कार्यकर्ता म्हणून त्याच्या भूमिकेची कदर करणे आवश्यक आहे अन्यथा कार्यकर्त्यांची माने दुभंगतील . कावळे आणि मावळयांचे राजकारण नेत्यांनी थांबवावे मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या सारखे मोठे मन आणि विशाल दृष्टीकोन ठेवावा अश्या भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या .यावेळी उपाध्यक्ष मौनेश्व्रर  गरग, शिव राज पाटील, केदार करडी. बाळू केरवाडकर ,मोटेश बार्देसकर ,आदी उपस्थित होते .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.