जनतेने बहुमत देऊन भाजप या सत्तेवर आणलं आहे म्हणून जनतेच्या प्रत्येक म्हणण्या नुसार सरकार चालेल का? जनतेच्या मनातली काम जाणून घेण्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड ए व्ही एम यांनी दिली आहे.
बेळगावातील सर्किट हाऊस मध्ये पत्रकारांशी बोलत होते सोमवार चिकोडी आणि मंगळवार असे दोन दिवस ते बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार ने आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली असुन या काळातील काम जनते पर्यंत पोचवण्यासाठी मी बेळगावला आलो असून बजेट आणि अनेक योजनांची माहिती सांगण्यासाठी आलो आहे असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात केंद्र प्रामाणिक असून सुरक्षा विमा ,फसल विमा योजना, कृषी उत्पादना योग्य दर देऊन सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्यात आल्यात. राज्य आणि केंद्राने मिळून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अस आवाहन देखील करत देशात एकूण 900 ठिकाणी केंद्र सरकारच्या योजना जनतेत पोचवण्याचे कार्यक्रम होतील असे ते म्हणाले.
भारत लोकशाहीचा देश असून इथे अनेकांना वयक्तिक हक्क आहेत.अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यला या देशात खूप महत्व आहे. काँग्रेस ला वाचवण्यासाठी पुढं आलेलं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रबद्दल केंद्र सरकारचा विरोध नाही. कायदेशीर रित्या प्रत्येकास पुढं येण्याचा अधिकार आहे काँग्रेसन कायध्यानुसार जनमत गोळा केल्यास आमचं सरकार विरोध करणार नाही असं ते म्हणाले.